Ad will apear here
Next
‘विठूमाऊली’तून उलगडणार वारीचा इतिहास
मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतून उलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठी निघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे ‘विठूमाऊली’ मालिकेत पहायला मिळणार आहे.

‘स्टार प्रवाह’वर ‘विठूमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता दाखविली जाते. या मालिकेत पुंडलिकाच्या आईवर संकट आले आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंड क्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला, तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो. कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या पुढील काही भागांतून मिळणार आहे; तसेच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणेही प्रेक्षकांना कळणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUYBQ
Similar Posts
‘विठूमाऊली’ टीमची पावसाळी सहल उत्साहात मुंबई : एखाद्या दिवशी अचानक सुट्टी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असे फार क्वचित घडते; मात्र, हे जेव्हा घडते तेव्हा ती सहल कायमच लक्षात राहते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धम्माल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुट्टी मिळताच ‘विठूमाऊली’च्या टीमने थेट भंडारदरा गाठले आणि वर्षा सहलीचा आनंद घेतला
‘विठूमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपतीबाप्पा मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपतीबाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरे आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे.
‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश मुंबई : टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’ने बाजी मारली आहे. ‘विठूमाऊली’च्या बेस्ट मार्केटिंग कॅम्पेनसाठी रौप्यपदक आणि ‘शतदा प्रेम करावे’च्या बेस्ट प्रोमोसाठी रौप्यपदक हे दोन पुरस्कार ‘स्टार प्रवाह’ने पटकावले. या पुरस्कारांच्या निमित्ताने
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language